मागच्या एका नोंदीत मी गाडगीळांच्या बर्याच प्रवासवर्णनपर पुस्तकांबद्दल लिहले होते. गोपुरांच्या प्रदेशात हे गंगाधर गाडगीळांचे पहिले प्रवासवर्णन. पुढे त्यांना रॉकफेलर फाऊंडेशनची अभ्यासवृत्ती मिळाली तेव्हा त्यांनी युरोप, इंग्लंड, अमेरिका, हवाई, जपान, बॅंकॉक, सिंगापूर असा भरभक्कम प्रवास केला. या प्रवासावरच त्यांनी बहुतेक प्रवासवर्णने लिहलेली आहेत. (अर्थात प्रत्येक प्रवासावर पुस्तक लिहलेले नाही. :-(
तर गंगाधर गाडगीळांनी लिहलेले लिहलेले ’चीन:एक अपूर्व अनुभव’ हे प्रवासवर्णन नुकतेच वाचले. लेखकांच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून त्यांना नोव्हेंबर १९९१ मध्ये चीनला जाण्याची संधी मिळाली. त्यातल्या अनुभवांवर हे पुस्तक बेतलेले आहे. तसे रुढार्थाने याला प्रवासवर्णन म्हणता येणार नाही. कारण प्रवासाची सुरुवात कशी झाली, कोणती ठिकाणे बघितली, त्यांचा इतिहास, त्या देशातल्या लोकांचे राहणीमान, आलेले अनुभव, घडलेले प्रसंग अशा वळणाने जाणारे हे पुस्तक नाही. गाडगीळांच्या आधीच्या प्रवासवर्णनपर पुस्तकांपेक्षा हे थोडे वेगळे आहे.
पण मग वेगळे म्हणजे कसे? गाडगीळ प्रस्तावनेत म्हणतात, "चीनचे प्रवासवर्णन हे अनुभवांचं प्रवासचित्रण असलं तरी प्राधान्यानं कलात्मक निर्मिती नव्हती. माहिती देणं, अनुभवांचा अन्वयार्थ लावणं हा या लेखनामागचा हेतू होता. त्यामुळे सातासमुद्रापलीकडे या पुस्तकातील लेख लिहताना जी पद्धती मी वापरली ती येथे वापरणं शक्य नव्हतं. चीनचं प्रवासवर्णन लिहताना काहीशी वेगळी पद्धती मी अनुसरली आहे. साहित्य, आर्थिक स्थिती, समाजजीवन इत्यादींबद्दलची प्रवासभर विखुरलेली निवेदनं मी एकत्र केली आहे. त्याचं विश्लेषण करुन अन्वयार्थ लावला आहे."
स्वत: गाडगीळ अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे साम्यवादाने वाटचाल करणार्या चीनचे त्यांनी बारीक निरीक्षण केले आहे. शहरांमधील मॉलमध्ये असणार्या गर्दीवरुन लोकांच्या क्रयशक्तीबद्दल, झोपडपट्ट्यांच्या प्रमाणावरुन साम्यवादाच्या उपयुक्ततेबद्दल अशा छोट्या छोट्या बाबींवरुन गाडगीळांनी या अजस्र ड्रॅगनचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.
एवढंच काय तर ते राहत असलेल्या हॉटेलातलं निरीक्षण नोंदवताना ते म्हणतात," चीनमध्ये आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो तेथे कधी कधी चार-पाच घड्याळे लावलेली असत. त्यात चीनमधील वेळेप्रमाणे अन्य महत्त्वाच्या शहरातील वेळही दाखवलेली असे. त्यामुळे चीनला कोणती शहरे महत्त्वाची वाटतात ते चटकन कळायचं. या घड्याळात टोकियो, न्यूयॉर्क, लॉस ऍंजेलिस, लंडन इत्यादी शहरांतल्या वेळा दाखवलेल्या असत. त्याबरोबरच कराचीतील वेळही दाखवलेली असे. पण दिल्ली अगर मुंबई येथील वेळ मात्र दाखवलेली नसे. म्हणजे चीनला पाकिस्तान जवळचा आणि महत्त्वाचा वाटतो, भारत नव्हे. आपण तिबेट चीनला आंदण दिल्यावर असं व्हावं हे अपेक्षितच होतं. भाईभाई असा उदघोष करणार्या आमच्या महान नेत्यांना मात्र ते कळलं नाही."
गाडगीळांची बारीक नजर पुस्तकात अशी सतत जाणवत राहते. एखाद्या लहान मुलाने प्रत्येक वस्तू कुतुहलाने न्याहाळावी तशी!
या प्रवासात त्यांनी चीनचा ग्रामीण भागही जवळून बघितला. चीनमधला ग्रामीण भाग आणि भारतातल्या गावाकडच्या चित्राची तुलना करताना त्यांनी लिहले आहे,"आपल्या ग्रामीण भागातून प्रवास करताना अनेक रिकामटेकडी माणसं रस्त्याच्या कडेला बसून गप्पा छाटताना आणि विड्या ओढताना दिसतात. अनेक परदेशी लोकांनी तुमच्या देशात माणसं अशी रिकामटेकडी कशी बसलेली असतात, असा प्रश्न मला विचारलेला आहे. चीनमध्ये मात्र रस्त्याच्या कडेला बसलेली अशी रिकामटेकडी माणसं मला आढळली नाहीत. सगळी माणसं कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली होती. नाही म्हणायला एक अगदी म्हातारी बाई आपल्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसलेली मला आढळली. पण तिच्या हातात सुद्धा काहीतरी विणकाम होतं." खूपच मार्मिक निरीक्षण आहे हे! डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हा वाक्प्रयोग वापरायचा मोह होतोय, तो आवरतो; मात्र काही तरी बोध देणारं नक्कीच म्हणता येईल. आणि गेल्याच काही वर्षात झपाट्याने आपल्या पुढे गेलेल्या चीनचं रहस्य उलगडणारंही!
चीनच्या प्रवासाला गेल्यावर तिथल्या अगम्य खाद्यसंस्कृतीबद्दलही काहीतरी उल्लेख येणे अपरिहार्यच आहे. तसा तो या पुस्तकातही आलेला आहे. गाडगीळ म्हणतात,"एका वाटोळ्या टेबलाभोवती आम्ही बसलो. त्या टेबलावर एक जराशी लहान वाटोळी तबकडी होती. तिच्यावर एकामागून एक पदार्थांच्या बश्या आणून ठेवल्या जाऊ लागल्या. चॉपस्टिकने खाता यावं इतकेच पदार्थाचे तुकडे केलेले असत, पण आमचे चिनी स्नेही आपल्या चॉपस्टीक्स इतक्या कौशल्यानं वापरत होते की आम्ही चकितच झालो. जेवणात किती पदार्थ असणार ते आम्हाला सांगितलेलं नसे. एकामागून एक असे ते सारखे येतच राहात. ते पंधरा तरी सहज असत. बॅंक्वेट असलं की त्यांची संख्या वीस किंवा अधिक असायची. त्यामुळे आपण काय खायचं, किती खायचं, कुठे थांबायचं हे ठरवणं फार अवघड व्हायचं."
अर्थात चीनला गेल्यावर गाडगीळांनी चंद्रावरुनही दिसण्याचा पोकळ दावा करणार्या जगप्रसिद्ध The Great Wall of China लाही भेट दिलीच.. त्याबद्दल ते म्हणतात,"...........
असो. पुस्तकाच्या ओळखीसाठी आणि मनुष्य प्राण्यांमध्ये उपजत असलेले कुतुहल जागे करण्यासाठी इतके लिखाण पुरे आहे. सगळेच सांगण्याचे काही कारण नाही, तेव्हा इथेच थांबतो.
पुस्तकाची पाने, प्रकाशक, मूल्य इ. बाबत माहिती देऊ शकत नसल्याबद्दल क्षमस्व! मी ते लायब्ररीतून आणून वाचले. बरीच जुनी प्रत होती.
-सौरभदा.
मराठी साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मराठी साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, २२ एप्रिल, २०१०
शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०
मराठीतील प्रवासवर्णने
मराठीत अनेक दर्जेदार लेखकांनी दर्जेदार प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत. अगदी गोडसे भटजींपासून ते मीना प्रभूंपर्यंत वेगवेगळ्या लेखकांनी हा लेखनप्रकार हाताळलेला आहे. त्यात प्रत्येकाची लिहण्याची शैलीही वेगळी. त्यामुळे अगदी व्यामिश्र म्हणता येईल इतकी वेगवेगळी प्रवासवर्णने मराठीत आहेत. थोडी काही नावे देतो. वासंती घैसास यांनी भारतातील प्रवासावर वर्णने लिहली आहेत. पुलंची तीन प्रवासवर्णने 'अपूर्वाई', 'जावे त्यांच्या देशा' आणि 'पूर्वरंग' सगळ्यांना माहित आहेतच. ( तुम्ही अजूनही वाचली नसतील एकतर तुम्हाला वाचनाची आवडच नसावी किंवा मग तुम्हाला कर्मदरिद्री म्हणण्यास हरकत नाही.) त्यानंतर रमेश मंत्रींनी अतिशय उत्तम प्रवासवर्णने लिहली आहेत. ते युसिस मध्ये कामाला होते त्यामुळे त्यांची सारखीच भटकंती चालू असे. गंगाधर गाडगीळांची गोपुरांच्या प्रदेशात, 'चीन-एक अपूर्व अनुभव', 'नायगाराचे नादब्रम्ह', 'रॉकी-अमेरिकेचा हिमालय' अशी एकाहून एक उत्तम प्रवासवर्णने आहेत. पण त्यांचे 'सातासमुद्रापलीकडे' हे माझे भयंकर म्हणजे भयंकर आवडते पुस्तक आहे. थोड्याशा ललित अंगाने जाणारे हे पुस्तक म्हणजे मराठीतल्या प्रवासवर्णनांमधले एक मानाचे मान पान आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे मीना प्रभूंनी देखील उत्तम प्रवासवर्णने लिहली आहेत. उलट त्यांचा हा एकच लेखनप्रकार मी वाचला आहे. याशिवाय त्यांनी इतर काही लेखन केलेले असल्यास मला तरी माहिती नाही. यामध्ये 'इजिप्तायन', 'तुर्कनामा', 'ग्रीकांजली', 'रोमराज्य भाग १ आणि २', 'चीनी माती' वगैरे बरीच पुस्तके आहेत. अण्णा भाऊ साठे यांचे 'माझा रशियाचा प्रवास' हे अवघे साठ सत्त्तर पानांचे पुस्तक तर अवश्य वाचनीय आहे.
अनेक उत्तमोत्तम पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. येत्या काही दिवसांत यांमधल्या काही पुस्तकांवर मी जरुर लिहीन. तोपर्यंत तुम्ही काही मिळवू शकलात तर जरुर वाचा. प्रत्येकाचीच पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया वेगवेगळी असते आणि वाचलेल्या सामाईक पुस्तकांबद्दल दुसर्याशी चर्चा करण्यासारखा आनंददायक अनुभव सारखा सारखा मिळत नाही.
-सौरभ.

टॅग्ज
एकूण,
प्रवास,
मराठी साहित्य
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०
छंदातूनच उपजीविका?
आजकाल मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच करियर करु देण्याचा सल्ला जो तो पालकांना देतो आहे. 'थ्री इडियटस' मध्येही हा विषय येऊन गेला आहे. ज्याची आपल्याला बिलकूल आवड नाही अशा क्षेत्रात काम करण्यापेक्षा आवडीच्या क्षेत्रात काम करुन कमी पैसे मिळाले तरी चालतील पण कामाचं समाधान मिळेल, तुमच्या आवडीचंच काम असल्यामुळे त्याचा ताण जाणवणार नाही असा यामागचा विचार आहे. पण आपल्यापैकी किती जण अशा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच काम करत आहेत हा संशोधन करण्यासारखा विषय आहे.
काही दिवसांपूर्वी वाचलेल्या माडगूळकरांच्या लेखात एक वेगळाच विचार वाचायला मिळाला. व्यंकटेश माडगूळकरांच्या 'चित्रे आणि चरित्रे' मध्ये एक लेख आहे. 'रंगरेषांचे मृगजळ' म्हणून. उत्तम आहे. माडगूळकरांना खरेतर चित्रकलेची फार आवड होती. पण परिस्थितीमुळे त्यांना चित्रकलेचा अभ्यास करता आला नाही. आपलं बालपण, आईच्या व्रतवैकल्यावेळी काढलेली वेगवेगळी चित्रं, पोळ्याला मातीचे बनवलेले बैल, शाळेतले चित्रकलेचे कलाल मास्तर, पुढे नोकरीधंद्यातले उमेदवारीचे दिवस अशा अनेक आठवणी माडगूळकरांनी या लेखातून आठवल्या आहेत.
त्यात ते म्हणतात,
"आपल्या छंदातूनच उपजीविका करता आली, तर उपजीविका करणं हे माणसाच्या मानेवरचं जोखड न होता विटीदांडूसारखा एखादा खेळ होईल. पण असे भाग्यवान फारच थोडे असतात, की ज्यांचा छंद आणि उपजीविकेचं साधन एकच असतं. आणि जरी असलं, तरी ज्याचा उपयोग अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापलीकडं होत नाही, असा अधिक पैसा मिळवण्यासाठी या छंदाचा, आणि स्व:तची उपजीविका करणार्या खेळाचा बोल बोल म्हणता धंदा होतो आणि कसलाही धंदा करायचा म्हटलं, की माणूस म्हणून आपण उणे उणेच होत जातो."
पटण्यासारखे आहेत हे विचार. एखाद्याला समजा चित्रकलेची आवड आहे. पण अमुक एखाद्या चित्रकाराच्या चित्राला एवढी रक्कम मिळाली म्हणून मग आता माझीही चित्रं अशीच विकली जाण्यासाठी एखाद्याने विचार सुरु केला तर छंदाचा आनंद मिळणे दुर्लभ होऊन जाईल. पोस्टाची तिकिटं गोळा करणे हा मला वाटतं जगातल्या सर्वाधिक लोकांचा छंद असावा. आता त्यातही एखाद्या संग्राहकाने मी अमुक तमुक तिकिटे मिळवीनच आणि त्यातली काही विकून एवढे पैसे मिळतील असा विचार केला तर तो छंद मनाचा विरंगुळा न राहता डोकेदुखी होऊन बसेल, नाही का?
tags:Thoughts, Literature, Painting, Hobby

मराठी साहित्य,
विचार,
व्यंकटेश माडगूळकर
शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०
प्रभाते मल दर्शनम्।
मागच्या नोंदीत मी अत्र्यांच्या शैलीबद्दल लिहले होते. त्यांच्या काही पुस्तकांची नावं सुद्धा त्यात होती. अत्र्यांचे एक पुस्तक 'ही ईश्वराची दया' मध्यंतरी वाचले. विविध विषयावरचे निबंध/लेख या पुस्तकात आहेत. 'प्राचीन भारत आणि गोमांस', 'प्राचीन भारतातील मद्यपान', 'आम्ही महार असतो तर..' असे एकाहून एक स्फोटक आणि भन्नाट लेख या पुस्तकात अत्र्यांनी लिहले आहेत. इथे त्याबद्दल अधिक काही लिहत नाही. इथेच सगळे लिहले तर तुम्ही ते पुस्तक कशाला वाचायला जाल? तर त्यातल्या एका लेखाचे शीर्षक आहे 'प्रभाते मल दर्शनम्|'
'प्रभाते कर दर्शनम्' चा मूळचा संस्कृत श्लोक बहुतेकांना माहीत आहेच. तो इथे परत देत बसत नाही. या लेखात अत्र्यांनी विनोबा भावे यांचा खास त्यांच्या ष्टाईलने समाचार घेतला आहे. विनोबा भाव्यांचे एक वचन/मत असे आहे की प्रभाते मल दर्शनम्|. (मला वाटतं ’माझा साक्षात्कारी हृदयरो’ मध्ये अभय बंग यांनीही या वचनाचा उल्लेख केला आहे.) तर विनोबांच्या मते सकाळी मलाचे दर्शन घेऊन त्याच्या रुपावरुन आपल्या प्रकृतीचे उत्तम विश्लेषण करता येते. त्यानेच आहार विहार सुधारुन उत्तम आरोग्य संपादता येते. शिवाय आपल्या शरीरातून बाहेर पडलेल्या मलाचे ओंगळ रुप पाहून शरीराबद्दल अनासक्ती उत्पन्न होते वगैरे वगैरे....
अत्र्यांनी याचा समाचार घेताना म्हटले आहे
'भंगी लोकांना रोजच्या रोज सामुदायिक मलदर्शन होते. मग त्यांना उत्तम तर्हेच्या आरोग्याचा, वैराग्याचा नि ऐश्वर्याचा कुठे लाभ होतो?'
'मानवी शरीर हे खरोखरच निसर्गाचे देणे आहे. त्यात नाना तर्हेचे सौंदर्य भरलेले आहे. रुपाचे आहे, रंगाचे आहे, आकृतीचे आहे, बलाचे आहे, नाना तर्हेच्या गुणाचे आहे. अरे जा रे जा, आम्ही निसर्गाची निरामय अपत्ये ह्या सृष्टीतल्या हर्षाचा, आनंदाचा नि संतोषाचा आजन्म मनसोक्त आस्वाद घेऊ. तुम्ही पाहिजे तर खुशाल तुमच्या कमोदात दाढी खुपसून आपल्या मलाचे यथेच्छ दर्शन नाही तर सेवन करत बसा.'
बापरे! काय भयंकर आहे ही भाषा! वाचता वाचता कधी अशा भाषेतलेही काही वाचायला मिळते.
Tags: Literature, Satire, Parody

आचार्य अत्रे,
एकूण,
मराठी लेखक,
मराठी साहित्य
सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०
अत्रे शैली...
आचार्य अत्र्यांचे लिखाण मला आवडते. इतरांनाही आवडत असावे, पण असं कुणी फारसे म्हणताना दिसत नाही. कारण म्हणायचा अवकाश की अत्रे विरोधक लगेच पुढे सरसावतात. आणि मग तुम्हाला वेड्यात काढतात, तुमच्या चुका दाखवतात. त्यांचे कुठे चुकले, ते असेच होते, त्यांचे वागणे तसेच होते इ.इ. गोष्टी उदाहरणांसकट ते तुम्हाला सांगतात. थोडक्यात काय तर ते तुम्हाला झोडपू पाहतात. पण आपण तिकडे लक्ष देऊ नये.
मला वाटते अत्र्यांचे व्यक्तिमत्वच असे आहे की ज्यांना ते आवडतात त्यांना ते शंभर टक्के आवडतात आणि आवडले नाही तर बिलकूलच आवडत नाहीत. म्हणजे एखाद्याला तुम्ही भेटला तर तो तुम्हाला असे म्हणणार नाही की, "अरे अत्रे काय फाकडू लिहतात रे! पण त्यांचे इथे जरा चुकलेच" वगैरे वगैरे. एवढे स्पष्टीकरण पुरेसे आहे.
अत्र्यांचे लिखाणातले मला आवडते ती म्हणजे त्यांची भाषा. अत्र्यांइतके सुगम, सोपे मराठी लिहणारे मराठी भाषेत इतर कोणी असल्यास मला ते माहित नाही. त्यांची काही पुस्तके वाचली आहेत (महापूर, हशा आणि टाळ्या, बत्ताशी आणि इतर कथा, मी कसा झालो, कर्हेचे पाणी इ.)त्यावरुन मला तरी असे वाटले. त्यात बोजड, कृत्रिम भाषा सापडणार नाही. ज्याचा मराठी वर्तमानपत्रे, मराठी साहित्य म्हणेज एकूणातच लिहिण्यावाचण्याशी फारसा संबंध आला नाही अशा व्यक्तीलाही समजण्यास अडचण पडणार नाही असे.
वृत्तपत्र चालवण्यात अत्र्यांचे बरेच आयुष्य गेले असल्याने असे असावे. वृत्तपत्रातली भाषा हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यात जडजंबाल भाषेत लिहून काही उपयोगाचे नाही. एकदा वाचून समजले नाही तर लोक सरळ पान उलटतात. परत वाचून समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. दुसरे असे की वृत्तपत्राचे आयुष्य असते उणेपुरे एक दिवसाचे. दुसर्या दिवशी त्याची रद्दी होते. पुढे त्याचा काही वापर झालाच तर तो फुलपुडी बांधण्यात किंवा वाण्याकडे.
त्यामुळे अत्र्यांची हीच सोपी भाषा इतर साहित्यातही उतरली असे मानता येईल. अर्थात त्यांनी स्वत: असा काही विचार केला होता का हे आपल्याला आता कसे कळणार?
tags: literature, writing style, opinion, newspaper

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१०
ललित नभी मेघ चार....
काही दिवसांपूर्वी शांता शेळके यांचे 'ललित नभी मेघ चार' वाचत होतो. ललित लेख आणि ते देखील शांताबाईंचे हा एक दुग्धशर्करा योग आहे. मुळात ललित हा प्रकारच इतका सुंदर आहे (ललित नावाखाली बोजड, दुर्बोध आणि अति अलंकारिक भाषा वापरुन ललित लिहणारे इथे अपेक्षित नाहीत.) तर या पुस्तकात असाच काही संदर्भासाठी विल ड्युरंट यांचा आधीच्या नोंदीतला परिच्छेद शांताबाईंनी दिलेला आहे. साध्या सोप्या भाषेतला हा मराठी अनुवाद या नोंदीत बघू.
"मानवी संस्कृती हा एक वाहता प्रवाह आहे. त्याला किनारे आहेत. माणसे आपापसात लढतात. चोर्यामार्या करतात. एकमेकांचा वध करतात. खूप संघर्ष करतात. त्यांच्या रक्ताने हा प्रवाह भरुन जातो आणि इतिहास या संघर्षाची, रक्तपाताची इमानेइतबारे नोंद करतो. पण त्याच वेळी याच या प्रवाहाच्या दोन्ही तीरांवर, शांतपणे, कुण्याच्या ध्यानातही येणार नाही अशा रीतीने, माणसे प्रेम करतात. विवाहबद्ध होतात. मुलाबाळांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करतात. गाणी म्हणतात, नाचतात आणि कविता लिहतात. मानवी संस्कृतीचा इतिहास म्हणजे खरोखर या प्रवाहाच्या तीरावर जे घडते त्याचा इतिहास असतो, असायला हवा. पण इतिहासकार निराशावादी असतात त्यामुळे संस्कृतिप्रवाहाच्या तीरावर जे जीवन फुलत असते त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि तिच्या रक्तलांच्छित प्रवाहाचेच चित्रण करत राहतात. "
असं काही वाचलं की वाटतं वाचनाच्या आवडीचं सार्थक झालं. पण असं काही वाचलं की हमखास वाटतं की अरे मलाही असं काही लिहता आलं असतं तर.....
जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही.
tags: Will Durant, History, English Literature

इतिहास,
एकूण,
मराठी लेखक,
मराठी साहित्य,
शांता शेळके
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)