फारा वर्षांपूर्वी एक विचित्र पक्षी होऊन गेला. तो म्हणे पावसाळा आला की शेतकरी लोकांना पेरते व्हा, पेरते व्हा असा संदेश देत असे. मग शेतकरी उठत आणि पेरणी सुरु करत. आता हा पक्षी सध्या अस्तित्वात आहे की नाही आणि नसला तर शेतकर्यांनी या संभाव्य अडचणीतून कसा मार्ग काढला आहे कुणास ठाऊक? सध्या पर्यावरणाचे असे कंबरडे मोडलेले आहे की कोण कधी नामशेष होऊन जाईल काही सांगता यावयाचे नाही. काळ मोठा कठीण आला आहे. 'आमच्यावेळी असं नव्हतं' असं म्हणणारेही आता फारसे राहिले नाहीत यावरुनच काळ किती कठीण आला आहे, परिस्थितीने कसे गंभीर रुप धारण केले आहे याची तुम्हाला कल्पना करता येईल.
असो. मला म्हणायचे आहे ते वेगळेच. मला असे म्हणायचे आहे की जर शेतात धान्य पिकवणार्या शेतकर्यांना असा काही संदेश कुणी देत असेल तर कागदावर कथा कवितांचे पीक घेऊ इच्छिणार्या "लेखकू" मंडळीना 'लिहिते व्हा!' असा संदेश का देऊ नये? तोच संदेश मी आज लेखकांना मी देऊन टाकतो.
दरवेळेस लोक विचारतात तुम्हाला लेखन सुचते कसे हो? तुम्ही कोणत्या वेळेला लिहता? अर्थात हे लोक मला विचारतात असे मी म्हणत नाहीये. मी कुठे, मोठमोठे लेखक कुठे? उगाच गोड गैरसमज करुन घेऊ नका. बहुतांश लेखकांना हा प्रश्न विचारला जातो हे मी सांगतो आहे. मी म्हणतो लेखन सुचते कसे यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? हे म्हणजे तुम्हाला जेवण पचते कसे हो? असे विचारण्यासारखेच आहे. मला तर सुचते पटापट. मी आताच मागे दोनतीन लेख हातासरशी लिहून काढले. ग्रंथालयात गेलो, लिहला त्यावर लेख. परीक्षेला गेलो, लिहला त्यावर लेख. आता तर लिहण्यावरही हा लेख लिहायला बसलो आहे. आहे काय त्यात मोठेसे?
त्यामुळेच लोकांना लिहायचे म्हटले की सुचत नाही याचे मला भारी आश्चर्य वाटते. ग्रॅहम ग्रीन या आंग्ल लेखकाला पण माझ्यासारखेच आश्चर्य वाटले. फरक एवढाच की त्याला आधी आश्चर्य वाटले आणि मला नंतर वाटले. पण म्हणून माझ्या आश्चर्याचे मूल्य उणावत नाही. असो. तो म्हणतो,"Writing is a form of therapy; sometimes I wonder how all those who do not write, compose or paint can manage to escape the madness, the melancholia, the panic fear which is inherent in the human situation." बघा कसे आहे? लिहणे हे एक प्रकारचे उपचारच आहेत. लिहिल्याशिवाय, काहीतरी रंगकाम केल्याशिवाय, तुम्ही जगूच कसे शकता? मनुष्यजातीला हा जो; कधी न संपणारा दुःखाचा, भीतीचा वारसा मिळालेला आहे त्यातून काहीतरी प्रसवल्याखेरीज तुमची सुटका होते तरी कशी? केवळ आणि केवळ दुःखाने भरलेल्या या निर्दय, पाषाणहृदयी जगात तुमचे चालते तरी कसे?
कसले अफलातून वाक्य आहे पहा! आणि एवढे रोजचे जगणे जिथे एक संघर्ष होऊन बसले आहे, परिस्थितीशी दोन हात करावे लागतात तिथे तुम्हाला लिहायला सुचू नये म्हणजे कमाल आहे. लिहिता येण्याची जादू अजून तुम्हाला कळालेली दिसत नाही. लिहिण्यातले सुख काय वर्णावे? जाऊदे. सांगत बसत नाही. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही म्हणतात. ( बघा आता हे वाक्य माझ्या आधीच कुणी लिहिले नसते तर तिघेही एका चांगल्या वाक्याला मुकलो असतो. आता हे तिघे कोण? तुम्ही लेको अगदीच हे आहात. त्यात एवढे डोके खाजवण्यासारखे काय आहे? मी, पर्यायाने तुम्ही आणि पर्यायाने हा लेखही!)
मी काय सांगत होतो ते आता तुमच्या थोडेफार लक्षात आले असेल. शिवाय आता लेखन करायचे झाले तर असेही नाही की लेखनाला लागणारी सामग्री तुमच्याजवळ नाही. म्हणजे लेखक होण्यासाठी अगदी आवश्यक असते, ( म्हणजे लोकांचा असा पक्का ग्रह झाला आहे) त्या अनुभवांच्या शिदोरीबद्दल मी बोलत नाहीये. लेखनसामग्री म्हणजे कागदाचे भेंडोळे आणि लिहायला पेन. व्यंकटेश माडगूळकर लहानपणी उत्तम चित्रे काढत असत. त्यांचा चित्रकलेचा हात चांगला होता. त्यांचे चित्रकलेचे कलाल मास्तर त्यांना म्हणाले,"तुझा हात चांगला आहे. शिकलास, कष्ट केलेस तर चांगला चित्रकार होशील." पण माडगूळकरांची परिस्थिती होती गरीब. रंगांशी खेळायचे म्हटले तर रंग आणि इतर साधनांना पैसे पडत होते. लेखनाला मात्र असले काही लागत नव्हते. कागद आणि साधेसे शाईचे पेन असले तरी पुरत असे. मग चित्रकार व्हायचे न जमल्यामुळे त्यांनी हातात लेखणी घेतली. पुढे त्यांनी कागदावरचीच पण चित्रापेक्षा वेगळी अशी शब्दचित्रे काढली कशी, माणदेश अजरामर झाला कसा हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.
हे झाले तेव्हाचे. सध्या मात्र ही साधनेही आवश्यक आहेत असे नाही. (याबाबत मात्र काळ मोठा कठीण आलेला नाही हे आपले सुदैवच म्हणायचे.) समोर संगणकाचा कीबोर्ड टंकायला असला तरी पुरते. सगळ्यांकडे असतोच तो. फक्त त्यावर काय बडवायचे तेवढे कळले पाहिजे.
लेखनसामग्रीची सोय झाल्यावर आता काय उरले? लिहावे कसे हा प्रश्न अजून राहिलाच आहे. त्याबद्दलही सांगून टाकतो. मध्यंतरी रविंद्र पिंग्यांचे एक पुस्तक वाचले. अप्रतिम होते. त्यात त्यांचा अर्नेस्ट हेमिंग्वेवर एक लेख होता. अर्नेस्ट हेमिंग्वेने नवोदित लेखकांना एक संदेश देऊन ठेवला आहे. पिंग्यांच्याच शब्दात तो बघू. हेमिंग्वे म्हणतो,"सतत चांगलं, अधिकाधिक चांगलं लिहिण्याचा ध्यास घ्या. आजच्यापेक्षा उद्याचं अधिक कलात्मक लिहून झालं पाहिजे. परवाचं त्यापेक्षा अधिक दर्जेदार हवं. असं हे अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या."
आहे की नाही कमाल? "अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या." मझा आ गया. वाचलं आणि दिल एकदम खुष होऊन गेला.
तर आहे हे असे आहे. लेखनसामग्रीची सोय लावून दिली, लिहावे कसे हे सांगून झाले आणि आता एवढे सांगितल्यावर तरी आता तुम्हाला लिहिण्यात काही अडचण येऊ अशी आशा करतो. त्यामुळे आता उठून, कमरा बांधून तुमच्या लेखणीचा उदयोस्तू करायला लागा. अर्थात लगेच तुम्हाला या प्राप्तकालात सुंदर लेणी खोदता यायची नाहीत. त्याला जरा वेळ लागेलच. हरकत नाही. शेवटी सब्रका फलच गोड होता है. पण शेवटी लिहाल ते अधिकाधिक चांगलं लिहिण्याचं मात्र विसरु नका. नाहीतर मी 'लिहिते व्हा!' चा संदेश देतोय आणि वाचकांनी किंवा लेखन छापायला जाल तर संपादकांनी तुम्हाला 'चालते व्हा!' चा संदेश देऊ नये म्हणजे मिळवली. काय समजलात?
विचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

मंगळवार, ६ जुलै, २०१०
मंगळवार, १ जून, २०१०
हे जग सुंदर आहे? आहेच!
हे जग सुंदर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कुणी म्हणेल "आम्हाला मान्य नाही". कुणी म्हणेल "आत्ता कळलं काय? बावळट आहेस लेका!"
पण मी खरंच सांगतोय. हे जग सुंदरच आहे. रोज सकाळी मी उठतो. नित्यकर्मे पार पाडत असतो. नळाला पाणी येत असतं. गॅस गिझरच्या कृपेने केवळ ४० (की ५० पैसे?) पैशात गरम पाण्याची बादली मिळते. पेपर वाचायला जावं तर काहीबाही भयंकर बातम्या वाचायला मिळतात. पण अवघ्या तीन रुपयात ('सकाळ'च्या एका अंकाच्या छपाईला १८ रुपये खर्च येत असताना) कोणताही उपद्व्याप न करता जगाच्या उलाढाली कोणीतरी तुमच्या पर्यंत पोहोचवत असताना, त्या बातम्यांचे फारसे वाईट वाटून घेण्याचे काही कारण आहे का?
आंघोळ उरकून बाहेर यावं तर खाली कांदे बटाटेवाल्याची हातगाडी आलेली असते. पों पों हॉर्न वाजवणारा इडली वाला एक चक्कर मारुन जातो. खारीवाल्याची ती नेहमीची ऍल्युमिनियमची भली मोठी पेटी सायकलवरून इकडेतिकडे फिरत असते. एवढंच काय तयार मोड आलेली मटकी सुद्धा मिळते. निदान आमच्या इथे तरी मिळते बुवा. आता अजून तुम्हाला काय पाहिजे? 'मटकी मोडाची' म्हणत जाणारी ही मटकीवाली मी रोज 'ऐकतो', अजुन तिला पाहिलेलं नाही. पण पाहायचा मी प्रयत्नही करत नाही. उगाच तिच्या आवाजावरुन माझ्या मनात तयार झालेली तिची प्रतिमा, तिला प्रत्यक्षात पाहून विस्कटून जाण्याची भीती मला वाटते. ( हे वाक्य थोडं तसलं झाले आहे, पण हरकत नाही. लेखकाला तेवढे स्वातंत्र्य असते.)
मग मी टीव्ही लावतो. सकाळच्या वेळेस इथे फारसे काही घडत नसते. इथले सगळे दळण संध्याकाळी सातनंतर सुरु होते. सकाळी कुणाला टीव्ही बघायला वेळ नसतो, असे असले तरी काहीतरी तर दाखवावेच लागते. मग काय दाखवतात? तर इथेही कुणीतरी पोटावरची चरबी विरघळवणारे उपकरण, स्लिम सोना बेल्ट तयार करायचे कष्ट घेतलेले असतात. ही जाहिरात करतानाही केवळ प्रेक्षकांचे 'तोंद' विरघळावे म्हणून कुणीतरी एवढा वेळ गरम पट्टा पोटाला लावून घामाघूम होऊन बसलेले असते. या जाहिरातीत काम करणार्या सुंदरी पण भयंकर असतात. त्या फारच पुरूषी वाटतात. मग पुढचा चॅनल! तर इथेही माझ्या उद्योगधंद्याला कुणाची नजर लागू नये म्हणून कुणीतरी एवढे परिश्रम घेऊन, संशोधन करुन Evil Eye Shielding Technique वापरुन नजर सुरक्षा कवच बनवलेले असते. ते पाहून मला एकदम गलबलल्यासारखे होऊन जाते. मन एकदम भरुन येते. शिवाय ते तुम्हाला ५००० नाही, ४००० नाही, ३००० हजारही नाही तर केवळ २४९५ वगैरे किंमतीला दिले जाते. अशा परोपकारी व्यक्तींच्या सदहेतूबद्दल काही शंका घेण्याचे कारण आहे का? किती नावं ठेवाल? परत एकदा विचार करा! जग सुंदर आहे की नाही? आहेच!
असो. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, त्याशिवाय मी काय सांगतो ते तुम्हाला पटायचं नाही. आमचे एक परिचित एकदा बसने जायला निघाले. बसस्टॉपवर उभे होते. बस आली, बसथांब्यावर थांबली. हे सांगण्यासारखे आहे कारण बस पुण्यातली होती. (पुण्यात तुम्ही बसथांब्यावर थांबलात आणि बस तुमच्या समोर बसथांब्यावर थांबली तर सरळ अंगाचा चिमटा घेऊन बघावा. त्याने एकतर तुम्ही झोपेतून तरी जागे व्हाल, नाहीतर आजचा दिवस तुमचा आहे हे लक्षात घेऊन प्रेयसीला लग्नाची मागणी घालणे, मित्राकडे बरेच दिवस थकलेले पैसे मागणे अशी कामे उरकून घ्यावीत. ताबडतोब होऊन जातात!) . तर सांगत होतो की बस पुण्यातली होती, बसचा कंडक्टर पुण्यातला होता, हे गृहस्थही पुण्यातलेच होते आणि हा प्रकारही पुण्यातच घडण्यासारखा होता. तर बसमध्ये चढल्यावर कंडक्टर या गृहस्थांकडे आला (अहो आश्चर्यम!) आणि त्यांना विचारलं, "कुठं जायचंय?", गृहस्थांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे म्हणून अमुक अमुक जाण्याचे ठिकाण सांगितले. सर्व काही सुरळीतपणे चालू होते. उन्हातून बसमध्ये शिरल्यामुळे हे गृहस्थ रुमालाने घाम पुसण्यात मग्न झाले. कंडक्टरने त्यांचे तिकिट फाडले आणि त्यांच्या पुढे धरले. गृहस्थांचा घाम पुसून झाल्यावर त्यांना कंडक्टर आपल्याकडे काहीतरी काम आहे अशा नजरेने बघत असलेला दिसला. त्यांनी विचारले, "काय?"
कंडक्टर वैतागला, त्याच्या चेहर्यावर आठी स्पष्टपणे झळकली. शिवाय 'हे पार्सल कुठल्या गावाहून आले आहे' ची सूक्ष्म छटाही त्यात मिसळलेली होती. "अहो, तुमचं तिकीट घ्या! सात रुपये झाले, सुट्टे नाहीत, दोन असले तर द्या, म्हणजे पाच द्यायला, नाहीतर उतरताना घ्या".
रुमालाची घडी आपल्या खिशात ठेवत गृहस्थ म्हणाले, "अहो पण माझ्याकडे पास आहे, मला तिकिटाची काही आवश्यकता नाही". पुढे बसमध्ये कसे दोन गट पडले, कसा गदारोळ उडाला, कशी बाचाबाची झाली वगैरे मी सांगत बसत नाही. बसमधल्या सामान्यजनांना कोणाची बाजू बरोबर आहे हे ठरवणे अगदीच अशक्य होऊन बसले आणि कोणीच माघार घेत नसल्याने सर्वसामान्य परिस्थितीत जे करण्यात येते तेच करण्यात आले. बस आपला नेहमीचा रस्ता सोडून पोलिस स्टेशनाकडे वळली.
पोलिस स्टेशनात विशेष म्हणजे त्या दिवशी पोलिस हजर होते. त्यांनी सगळे गार्हाणे ऐकून घेतले. आता पुढे काय ह्याची उत्सुकता सगळ्यांना वाटत होती. वेळ वाया जातोय म्हणून काही चाकरमाने निघून गेले असले तरी काही डांबरट लोक पुढे काय होते ते पाहण्यासाठी थांबलेले होते.
पण पुढे काहीच झाले नाही. सायबांनी स्वत: तिकिटाचे सात रुपये भरले. शिपायाला सांगून दोन चहा मागवले. कंडक्टर आणि गृहस्थाला चहा पाजला. अटक, वॉरंट, जामीनावर सुटका, जातमुचलका (हा शब्द कसला सेक्सी आहे राव!), न्यायालयीन कोठडी, थर्ड डिग्री यातले काही म्हणजे काही झाले नाही. And they all lived happily ever after च्या चालीवर सगळेच सुरळीत होऊन गेले.
बघा विचार करा! असा अनुभव यायला भाग्य लागते. हे जग सुंदर नसते तर असे काही शक्य झाले असते का? तिकिटाचे पैसे भरायचे राहिलेच बाजूला, मस्तपैकी चहाने वगैरे सरबराई झाली. तीसुद्धा पोलिस स्टेशनात. याला काय म्हणावे? या सगळ्याचे तात्पर्य काय? तात्पर्य दुसरे काही नाही! हे जग सुंदर आहेच.
सावकाश विचार करुन तुमचे मत सांगा, तोपर्यंत मी हा लेख प्रसिद्ध करतो. ( बाकी लेख प्रसिद्ध करणे आणि तो प्रसिद्ध होणे/असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. पण आपण एकाच शब्दावर काम उरकत आहोत. What you say?)

शनिवार, ८ मे, २०१०
कसाबला फाशी आणि सकाळचा चंपक अग्रलेख...
कसाबला फाशी झाली. दोन दिवस झाले. समाजाची स्मरणशक्ती तशी कमी असतेच म्हणा. थोड्याफार दिवसांची गोष्ट आणि कुणाच्या हे लक्षातही राहणार नाही. मला मात्र सकाळमध्ये जो अग्रलेख प्रसिद्ध झाला तो वाचून हसावे की रडावे हे कळेनासे झाले आहे.
बकवास शीर्षकापासूनच याची सुरूवात झाली आहे. "कसाबचा झाला; आता इतरांचाही करा हिसाब"
कसाब काय हिसाब काय? यमकाचा हा कसला फालतू अट्टहास?
पण पुढे आख्खा अग्रलेखच इतक्या हास्यास्पद विधानांनी भरलेला आहे की शीर्षकाचे काहीच वाटायला नको. सुरुवातीचा भाग ठीक आहे. पण पुढेपुढे असली नमुनेदार विधानं केली आहेत ती बघण्यासारखी आहेत.
"कसाब जिवंत हाती लागला त्यामुळे भारतातील अतिरेकी कारवायांमधील पाकिस्तानचा हात स्पष्ट झाला." - हे आधीही स्पष्ट झालेलं आहे, त्याने पाकिस्तानला काय फरक पडला? पाकिस्तानवर कुणी कारवाई केली आहे काय?
"कसाब पकडला गेल्यामुळे पाकिस्तानला नाटक म्हणून का होईना, पण मुंबईतील अतिरेकी हल्ल्यांसंबंधीचा खटला चालवावा लागला." - याच्यातून काय निष्पन्न झाले? कुणाला शिक्षा झाली?
"दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या टाइम्स स्क्वेअरमधे बॉंब ठेवताना पकडल्या गेलेल्या फैजलने आपण पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवाया करण्यासाठी आल्याचे कबूल केल्याने महासत्तेला आता पाकिस्तानविरुद्ध डोळ्यांवर कातडे पांघरुन स्वस्थ बसणे शक्य होणार नाही." - अमेरिका? पाकिस्तानवर कारवाई? पाकला मध्येच आठवण आली की सज्जड दम, तंबी वगैरे देणे आणि दरवेळेस डॉलर्सच्या मदतीचा ओघ वाढवणे यापेक्षा अमेरिका दुसरे काहीही करत नाही. आता तुम्ही बरे झाले सांगितले. अमेरिका नक्कीच धोरणात बदल करेल.
"वरच्या न्यायालयांमध्ये कसाबला झालेल्या शिक्षेची जसजशी शहानिशा होईल, तसतसे पाकिस्तानला अतिरेकी कारवायांशी असलेला आपला संबंध नाकारणे जड जाईल." - खी: खी: खी:
"१९९३ च्या बॉंबस्फोट खटल्यापेक्षा कसाबचा खटला वेगाने चालला आणि त्यातील साक्षीपुराव्यांनुसार आरोपीला कठोर शिक्षा केल्याने भारताचा याबाबतीतील कठोरपणाही जगासमोर आला." - कुठे आहे हा कठोरपणा? आम्हाला कसा दिसला नाही अजून? काही ठराविक व्यक्तींनाच दिसतो काय? म्हणजे तुम्ही बॉंबस्फोट करा, शेदोनशे माणसं मारा आणि आम्ही त्याचा लवकर खटला चालवतो आणि त्यांना कठोर शिक्षा करतो. बकवास!
"भारत हा अतिरेकी कारवायांसाठी कायमचा बकरा बनणार नाही हेही या निकालाने अतिरेकी कारवायांना पाठीशी घालणार्या आणि पाठबळ पुरवणार्या शेजारी देशांनी लक्षात घेतलेले बरे." - खी:खी: खी:! त्यांनी लक्षात घेतले आहे. तसे सांगणारा इमेल मला कालच आला. पण मग तरीही पुण्यातले बॉंबस्फोट कुणी केले बरे?
"भारतीय न्यायव्यवस्थेवर असलेला आमचा विश्वास या निकालाने आणखी दृढमुल झाला अशी भावना अनेकांनी ठामपणे बोलून दाखवली." भारत हा एक मूर्ख लोकांचा देश आहे. कोण आहेत हे लोक? त्यांचा पत्ता तरी द्या. अरे अफजल गुरुच आता फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये २२ व्या नंबरला आहे. त्याला अजून शिक्षा नाही. आणि कसाबचं काय घेऊन बसलाय? मला तर असं वाटतंय की एखाद्याचा खून करुन फाशीची शिक्षा घेऊन बसावं. बरीच वर्षे आरामशीरपणे काढता येतील. पोटापाण्याची चिंता करायची कारण नाही. या काळात उत्तमोत्तम ग्रंथ वाचावेत, टिपणं काढावीत, लिखाण करावं. एकूणातच चिंतन, मनन करत आयुष्य घालवावं. कसला आला आहे पश्चात्ताप?
"देशद्रोही कसाबला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आनंद व्यक्त करणारे, मिठाई वाटणारे मुस्लिम समाजातलेही नागरिक होते, ही देशफोड्या अतिरेक्यांना भारतीयांनी लगावलेली सणसणीत चपराक आहे." - ही असली वाक्यं लिहणारा कोण आहे? संपादक की बुजगावणं? कुठल्या जगात वावरता आहात तुम्ही? चपराक? चपराकचा अर्थ कळतो का तुम्हाला? साधं या अतिरेक्यांच्या यावनी दाढीलाही भारताला अजून हात लावता आलेला नाही आणि चपराक कशाची डोंबलाची? स्वत:ची पाठ थोपटायची तरी किती? या असल्या पुचाट विधानांनी स्वत:ची समजूत किती दिवस काढणार?
एकंदरीत एखाद्या बुजगावण्याने हा अग्रलेख लिहलाय असेच मला तरी वाटत आहे. केवळ आणि केवळ जाहिरातींच्या मागे लागलेल्या आणि वर्षभर खरेदीची फालतू प्रदर्शने भरविणार्या सकाळने हे असले बकवास अग्रलेख लिहावेत तरी कशाला? तुम्हाला जर सरकारला कडक शब्दात सुनावता येत नसेल, जाब विचारता येत नसेल तर त्यापेक्षा वसंत संपात कधी येतो, सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम कधी करावा? आणि अधिक मास कधी येतो, त्यात काय काय करावे हीच चर्चा चालू राहू द्या की! कसे?

गुरुवार, २९ एप्रिल, २०१०
समज गैरसमज...
"आई, मला एक सांग, या विवाह नामक प्रकाराची लोकांना एवढी आवड का आहे बरे? जो तो उठतो तो आपला विवाह करायला बघत असतो. आणि म्हणे की लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास उडायला लागला आहे. लुच्चे, खोटारडे कुठले!"
"नाही तरी तुझी काही लग्नाची तयारी नाही. सांगून सांगून थकले मी. माझी अर्धी लाकडं आता स्मशानात गेली तरी सूनमुख पाहण्याचं काही माझ्या नशिबात दिसत नाही. ज्यांना करायचा आहे ते करतील. तुला त्याचा त्रास का बाबा?
"मला त्रास का म्हणजे? वा गं वा! पेपरात असलं काही छापून येतं ते आम्हालाच वाचावं लागतं ना? ऑं? तुम्हाला काय करायचं ते करा म्हणावं चार भिंतींच्या आत! पेपरात छापून आणून आमच्या आईवडिलांची आमच्या मागे भुणभुण कशाला सुरु करता?"
"अरे पण कधी ना कधी तर लग्न करायलाच लागणार ना बाबा? पुढे तुझं वय वाढल्यावर हातीपायी धड मुलगी मिळायची मारामार होऊन बसेल."
"अगं आई, असं नसतं आता आजकाल, एकाने पोट भरलं नाहीतर लोक तीनचार देखील करायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि वयाचा तरी कुठे प्रश्न उरला आहे? अगं जिथे ’बालिकावधू’चं लग्न लोक मिटक्या मारत बघत आहेत आणि कसल्या कसल्या वाह्यात लोकांचे ’स्वयंवर’ होऊन त्यांना बायका मिळत आहेत तिथे माझ्या लग्नाची काय काळजी करतेस?"
"अरे देवा! कालचं बालिकावधू बघायचं राहून गेलं की रे! अरे न्यूजचॅनलवर त्या दोघांची एकत्र अशी पहिलीच मुलाखत लागली होती ती बघता बघता राहूनच गेलं."
"असल्या मालिकांचं रोजचं दळण बघणारी, डोक्याने अधू असलेली माणसं आहेत; म्हणूनच या कुलवधूंचं फावलं आहे."
"काय म्हणालास?"
"कुठे काय? काही नाही. तूच कुणा दोघांबद्दल काहीतरी सांगत होतीस."
"काय छान दिसत होते दोघं अरे... मला तर फार आनंद झाला बघ. किती वाद, भानगडी झाल्या पण शेवटी सगळं काही सुरळीत झालं हे काय कमी आहे का?"
"एवढं सगळं काही बाहेर आल्यावर आता तसं सुरळीत चाललंय असंच म्हणावं लागेल. तू म्हणतेस ते बरोबर आहे. तसे वयाच्या मानानं चांगलेच आहेत म्हणायचे दोघेही दिसायला. तो तर काय परराष्ट्रातलाच ना? ती पण तशी ठीक आहे म्हणा."
"परराष्ट्र? अं हो हो, ते परराष्ट्रच आहे म्हणा! पण मी काय म्हणते की एवढे चांगले चांगले इतर पर्याय असताना आधीच एक लग्न झालेला मुलगा तिने का निवडला असावा?"
"मला काय माहित? नोकरीला जशी अनुभवाची गरज असते तसेच आता लग्नाचा जोडीदारही अनुभवीच हवा असा लोकांचा ग्रह होऊ लागलेला दिसतो."
"काय माहित बाबा? तसेही असेल. कशाचा कशाला धरबंद राहिलेला नाही. उद्या काय बघावे लागेल, वाचावे लागेल काही सांगता यायचे नाही."
"पण मी काय म्हणतो आई, ही बातमी बाहेर फुटलीच कशी? स्वत:च्या लग्नाची बातमी पेपरात छापून येते, रिकामटेकडे लोक ती चांगली चघळत बसतात, तिचं चर्वितचर्वण करतात, हे पाहून यांना काहीच कसं वाटत नाही?"
"अरे हे सगळं त्या नालायक मीडियाचं काम रे! ब्रेकिंग न्यूज मिळवता मिळवता स्वत:चं कंबरडं मोडायची वेळ आली तरी त्यांना काही व्हायचं नाही."
"हो ना तसे आहे खरे! पण मी काय म्हणतो, हा एवढा सगळा गदारोळ झाला, एवढी लफडी कुलंगडी बाहेर पडली, आता त्या संघांचे काय होणार काय माहित!"
"संघाचे काय होणार कप्पाळ! तो पुढेही त्याची खेळी खेळतच राहील बघ. उलट त्याच्या कामगिरीत सुधारणाच होईल बघ."
"सुधारणा कसली व्हायची आहे डोंबलाची. त्याला खूप पश्चाताप होऊन त्याच्या वागणुकीत सुधारणा होईल असे तुला वाटत असेल तर तो भ्रमच म्हटला पाहिजे."
"हो रे बाबा! पुरुषाचीच जात ती! कधी सुधरायची नाही. पण आता कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करणार वगैरे काही कळलं का रे?"
"प्रतिनिधित्व वगैरे काही नाही आता. भारतातून गच्छंती व्हायची वेळ आल्यावर कसलं आलं आहे प्रतिनिधित्व?"
"असं का बोलतोस रे? मी तर त्यांना आशीर्वाद दिलाय. ’सुखाने नांदा पुष्कळ’!"
"काय म्हणालीस? हे बरं आहे की! तुला बरं सगळं माहित असतं आजकाल आई! तुला अगदी नावसुद्धा माहित आहे सुनंदा पुष्कर?"
"काय? कोण ही सुनंदा पुष्कर? कशाबद्दल बोलतो आहेस? तू स्वत: कोणती मुलगी बघितली आहेस का? माझी काही हरकत नाही हं बाबा! उगीच डोक्यात राख घालून घेऊ नकोस."
"काय? माझं लग्न सुनंदा पुष्करशी? अगं आई काय बरळतेस तू?"
"अरे गाढवा तू काय बोलतो आहेस मग?
"अगं आई मी तर शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल बोलत होतो. तू कशाबद्दल बोलत होतीस?"
"अरे देवा, मी तर सानिया आणि शोएब मलिक बद्दल बोलत होते रे..."
"दुर्दैव आपलं, दुसरं काय? मी काय म्हणतो आई, आता आपण लोकांच्या दुसर्या तिसर्या लग्नाबद्दल, जी निश्चितच अभिनामाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, तिच्याबद्दल बोलत असतानाही; मी जे बोलत होतो त्याचसारख्या दुसर्या एका घटनेबद्दल तू बोलत होतीस याला काय म्हणावं? जगाची नीतिमत्ता एवढी खालावली गेल्या काही वर्षांत?"
"चिंता करण्यासारखीच परिस्थिती आहे बाबा! कलियुग कलियुग म्हणतात ते हेच."
"आई तुझी माफी मागितली पाहिजे."
"कसली माफी मागतोस बाबा? जिथं लोकांनाच काही लाज उरलेली नाही, तिथं तू आणि मी एकमेकांची माफी मागून काय होणार? जे जे होईल ते बघत राहणे हेच सामान्य माणसाच्या हातात राहिले आहे."

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०
शब्दकोड्यातले काही खास शब्द!
वृत्तपत्रातून नियमितपणे प्रसिद्ध होणारी शब्दकोडी सोडवण्याची बर्याच जणांना आवड असते. मध्यंतरी सुडोकूचे पण अगदी पेव फुटले होते. जवळजवळ प्रत्येक वृत्तपत्राने सुडोकू छापायला सुरुवात केली होती. मध्ये काही प्रदर्शनांना भेटी दिल्या तेव्हा तिथे सुडोकूची देखील पुस्तके विकायला ठेवलेली पाहून मी चाटच पडलो होतो.
असो. तर सांगत होतो की वृत्तपत्रातून येणारी शब्दकोडी सोडवणे हा वेळ घालवण्याचा एक झकास उपाय आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपले मराठी बर्यापैकी आहे तर शब्दकोडी सोडवून पहा. तुम्हाला काही नवीन शोध लागण्याची शक्यता आहे. :-)
ही शब्दकोडी दररोजच प्रसिद्ध होत असतात. काही जण त्याकडे ढुंकुनही पाहत नाहीत पण नियमाने कोडे सोडवणार्यांना एक दिवस कोडे आले नाही (शब्दकोडे न सुटण्याबद्दल मी म्हणत नाहीये तर प्रसिद्ध झाले नाही की) तर अस्वस्थ व्हायला होते. उदाहरणार्थ बर्याचदा कोडी सोमवार ते शुक्रवारच प्रसिद्ध होतात. पण मग कोडेवेड्यांसाठी रविवारी खास जंबो किंवा महा शब्दकोडे असते. हे नुसते महाच नसते तर यातल्या काळ्या चौकोनांची विशेष रचना (Design) ही बनवलेले असते.
पट्टीचे कोडे सोडवणार्यांना त्यात येणारे खास शब्द माहित असतात. हे शब्द तुम्हाला माहित असणे जरुरीचे आहे. कारण हे शब्द खास शब्दकोड्याचेच शब्द असतात. रोजच्या जीवनात यांचा वापर कुणी करत नाही. शिवाय रोजचे कोडे बनवणारी व्यक्ती पण एकच असल्याने त्या व्यक्तीचे खास शब्द, शैली पण कळून यायला लागते.
तर हे खास शब्द कोणते असतात? (मी काही पट्टीचा कोडे सोडवणारा नाही पण साधारणत: कधीतरी संपूर्ण सुटते आणि बर्याचदा एखादा दुसरा शब्द अडून बसतो/राहतो.) रमणा या शब्दाचा अर्थ किती जणांना माहित आहे? हा नेहमी येणारा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो दक्षिणा वाटण्याची जागा! माहित होतं तुम्हाला? दुसरा एक आहे र नेच सुरु होणारा. फाशांवरुन शकुन ओळखण्याच्या विद्येला काय म्हणतात? काही अंदाज? याचा योग्य शब्द आहे रमल. हा एक विचित्रच शब्द आहे. एकवेळ जेवून राहण्याचे एक व्रत आहे त्याला काय म्हणतात? नक्त!
तर असेच काही खास शब्द रोज कोडे सोडवलं तरच कळतील असे असतात. त्यासाठी आज कोडे सोडवून परत उद्या त्याचे उत्तर तपासून बघावे लागते. असे केलं तर निव्वळ दोन आठवड्यात तुम्हीही यात तरबेज होऊ शकाल. कधीतरी इंटरनेटवर विहरताना करताना कंटाळा आला तर कोडं सोडवून बघा. त्यात एक वेगळीच मजा आहे.
tags:Crossword, Language, Time pass
-सौरभ

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०
छंदातूनच उपजीविका?
आजकाल मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच करियर करु देण्याचा सल्ला जो तो पालकांना देतो आहे. 'थ्री इडियटस' मध्येही हा विषय येऊन गेला आहे. ज्याची आपल्याला बिलकूल आवड नाही अशा क्षेत्रात काम करण्यापेक्षा आवडीच्या क्षेत्रात काम करुन कमी पैसे मिळाले तरी चालतील पण कामाचं समाधान मिळेल, तुमच्या आवडीचंच काम असल्यामुळे त्याचा ताण जाणवणार नाही असा यामागचा विचार आहे. पण आपल्यापैकी किती जण अशा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच काम करत आहेत हा संशोधन करण्यासारखा विषय आहे.
काही दिवसांपूर्वी वाचलेल्या माडगूळकरांच्या लेखात एक वेगळाच विचार वाचायला मिळाला. व्यंकटेश माडगूळकरांच्या 'चित्रे आणि चरित्रे' मध्ये एक लेख आहे. 'रंगरेषांचे मृगजळ' म्हणून. उत्तम आहे. माडगूळकरांना खरेतर चित्रकलेची फार आवड होती. पण परिस्थितीमुळे त्यांना चित्रकलेचा अभ्यास करता आला नाही. आपलं बालपण, आईच्या व्रतवैकल्यावेळी काढलेली वेगवेगळी चित्रं, पोळ्याला मातीचे बनवलेले बैल, शाळेतले चित्रकलेचे कलाल मास्तर, पुढे नोकरीधंद्यातले उमेदवारीचे दिवस अशा अनेक आठवणी माडगूळकरांनी या लेखातून आठवल्या आहेत.
त्यात ते म्हणतात,
"आपल्या छंदातूनच उपजीविका करता आली, तर उपजीविका करणं हे माणसाच्या मानेवरचं जोखड न होता विटीदांडूसारखा एखादा खेळ होईल. पण असे भाग्यवान फारच थोडे असतात, की ज्यांचा छंद आणि उपजीविकेचं साधन एकच असतं. आणि जरी असलं, तरी ज्याचा उपयोग अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापलीकडं होत नाही, असा अधिक पैसा मिळवण्यासाठी या छंदाचा, आणि स्व:तची उपजीविका करणार्या खेळाचा बोल बोल म्हणता धंदा होतो आणि कसलाही धंदा करायचा म्हटलं, की माणूस म्हणून आपण उणे उणेच होत जातो."
पटण्यासारखे आहेत हे विचार. एखाद्याला समजा चित्रकलेची आवड आहे. पण अमुक एखाद्या चित्रकाराच्या चित्राला एवढी रक्कम मिळाली म्हणून मग आता माझीही चित्रं अशीच विकली जाण्यासाठी एखाद्याने विचार सुरु केला तर छंदाचा आनंद मिळणे दुर्लभ होऊन जाईल. पोस्टाची तिकिटं गोळा करणे हा मला वाटतं जगातल्या सर्वाधिक लोकांचा छंद असावा. आता त्यातही एखाद्या संग्राहकाने मी अमुक तमुक तिकिटे मिळवीनच आणि त्यातली काही विकून एवढे पैसे मिळतील असा विचार केला तर तो छंद मनाचा विरंगुळा न राहता डोकेदुखी होऊन बसेल, नाही का?
tags:Thoughts, Literature, Painting, Hobby
-सौरभ.

टॅग्ज
एकूण,
मराठी साहित्य,
विचार,
व्यंकटेश माडगूळकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)