सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

शब्दकोड्यातले काही खास शब्द!

    वृत्तपत्रातून नियमितपणे प्रसिद्ध होणारी शब्दकोडी सोडवण्याची बर्‍याच जणांना आवड असते. मध्यंतरी सुडोकूचे पण अगदी पेव फुटले होते. जवळजवळ प्रत्येक वृत्तपत्राने सुडोकू छापायला सुरुवात केली होती. मध्ये काही प्रदर्शनांना भेटी दिल्या तेव्हा तिथे सुडोकूची देखील पुस्तके विकायला ठेवलेली पाहून मी चाटच पडलो होतो.
    असो. तर सांगत होतो की वृत्तपत्रातून येणारी शब्दकोडी सोडवणे हा वेळ घालवण्याचा एक झकास उपाय आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपले मराठी बर्‍यापैकी आहे तर शब्दकोडी सोडवून पहा. तुम्हाला काही नवीन शोध लागण्याची शक्यता आहे. :-)
    ही शब्दकोडी दररोजच प्रसिद्ध होत असतात. काही जण त्याकडे ढुंकुनही पाहत नाहीत पण नियमाने कोडे सोडवणार्‍यांना एक दिवस कोडे आले नाही (शब्दकोडे न सुटण्याबद्दल मी म्हणत नाहीये तर प्रसिद्ध झाले नाही की) तर अस्वस्थ व्हायला होते. उदाहरणार्थ बर्‍याचदा कोडी सोमवार ते शुक्रवारच प्रसिद्ध होतात. पण मग कोडेवेड्यांसाठी रविवारी खास जंबो किंवा महा शब्दकोडे असते. हे नुसते महाच नसते तर यातल्या काळ्या चौकोनांची विशेष रचना (Design) ही बनवलेले असते.
    पट्टीचे कोडे सोडवणार्‍यांना त्यात येणारे खास शब्द माहित असतात. हे शब्द तुम्हाला माहित असणे जरुरीचे आहे. कारण हे शब्द खास शब्दकोड्याचेच शब्द असतात. रोजच्या जीवनात यांचा वापर कुणी करत नाही. शिवाय रोजचे कोडे बनवणारी व्यक्ती पण एकच असल्याने त्या व्यक्तीचे खास शब्द, शैली पण कळून यायला लागते.
    तर हे खास शब्द कोणते असतात? (मी काही पट्टीचा कोडे सोडवणारा नाही पण साधारणत: कधीतरी संपूर्ण सुटते आणि बर्‍याचदा एखादा दुसरा शब्द अडून बसतो/राहतो.) रमणा या शब्दाचा अर्थ किती जणांना माहित आहे? हा नेहमी येणारा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो दक्षिणा वाटण्याची जागा! माहित होतं तुम्हाला? दुसरा एक आहे र नेच सुरु होणारा. फाशांवरुन शकुन ओळखण्याच्या विद्येला काय म्हणतात? काही अंदाज? याचा योग्य शब्द आहे रमल. हा एक विचित्रच शब्द आहे. एकवेळ जेवून राहण्याचे एक व्रत आहे त्याला काय म्हणतात? नक्त!

    तर असेच काही खास शब्द रोज कोडे सोडवलं तरच कळतील असे असतात. त्यासाठी आज कोडे सोडवून परत उद्या त्याचे उत्तर तपासून बघावे लागते. असे केलं तर निव्वळ दोन आठवड्यात तुम्हीही यात तरबेज होऊ शकाल. कधीतरी इंटरनेटवर विहरताना करताना कंटाळा आला तर कोडं सोडवून बघा. त्यात एक वेगळीच मजा आहे.
tags:Crossword, Language, Time pass
-सौरभ

६ टिप्पण्या:

  1. मध्ये काही प्रदर्शनांना भेटी दिल्या तेव्हा तिथे सुडोकूची देखील पुस्तके विकायला ठेवलेली पाहून मी चाटच पडलो होतो.

    - I didn't get what you mean by above statement.

    Marathi paper madhoon yenaari bahutek sudoku "easy" category madheel astaat. There is more to sudoku in terms of difficulty levels and variations. Since last 5 years "World Sudoku Championship" is organized and to select indian team for the event, "Indian Sudoku Championship" is organised.

    Sudoku is more popular .. but there are many other types of "logical puzzles" .. which are independent of language/culture. Similar to champiosnhips for sudoku, World/Indian Puzzle Championships are also held for more than 10 years.

    उत्तर द्याहटवा
  2. अनामित, सुडोकूची पुस्तके म्हणजे त्यात प्रत्येक पानावर एक अशी अनेक सुडोकू कोडी असतात. त्यात काठिण्यपातळी पण दिलेली असते वगैरे वगैरे....
    सुडोकूच्या बाकी माहितीसाठी धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. saurabh,

    sudokuchi pustake mhanje kaay te malaa maahit aahe .. maazaa rokh "Sudokuchi dekheel" madheel "dekheel" shabdaakade hota .. aani tyaat chaat padnyaasaarkha kaay aahe te malaa kalala naahi. mhanoon tumhala sudoku chi thodi maahiti puravali.

    i personally like crosswords as well as logical puzzles. But crossword has limilation of the language. sudoku/logical puzzles are universal.

    उत्तर द्याहटवा
  4. >>> शिवाय रोजचे कोडे बनवणारी व्यक्ती पण एकच असल्याने त्या व्यक्तीचे खास शब्द, शैली पण कळून यायला लागते.

    --- अगदी, अगदी. बाकी तुला रमलखुणा वरून रमल आठवायला हवं ;)

    उत्तर द्याहटवा
  5. अरे हो की.....

    माझ्या आत्ता लक्षात आले.

    उत्तर द्याहटवा
  6. "काही जण त्याकडे ढुंकुनही पाहत नाहीत पण नियमाने कोडे सोडवणार्‍यांना एक दिवस कोडे आले नाही (शब्दकोडे न सुटण्याबद्दल मी म्हणत नाहीये तर प्रसिद्ध झाले नाही की) तर अस्वस्थ व्हायला होते."
    अगदी बरोबर.. मी त्यापैकी एक 🙂

    उत्तर द्याहटवा