यावर्षी नेहमी प्रमाणे अर्थसंकल्प सादर झाला, त्यावर उलटसुलट चर्चा झाल्या, वाद प्रतिवाद झाले, काय महागलं काय स्वस्त झालं याच्या बातम्या जनतेने बारीक डोळे करुन वाचल्या.
पण माझी मात्र घोर निराशा केली आहे या अर्थसंकल्पाने..... एका नाही दोन्ही अर्थसंकल्पांनी. वर्षभरात एकदाच येणारा योग चुकला खरा....
मी अगदी आतुरतेने वाट बघत असलेली गोष्ट घडलीच नाही. 'तोंडाला पाने पुसली' हा वाक्प्रचार यावेळेस काही केल्या मला वर्तमान पत्रांच्या मुखपृष्ठावर वाचायला मिळाला नाही. असंघटितांच्या तोंडाला पाने पुसली असे बाबा आढाव म्हणाले पण ही बातमी अगदी कुठे कोपर्यात होती.
बॅनर्जी बाईंनी रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरुन दिले. (त्यालाही महाराष्ट्राच्या झोळीत किंवा पदरात अमुक अमुक पडले अशा बातम्या वृत्तपत्रांनी छापल्या.) प्रणवदांनी सामान्यांचा खिसा कापणारा अर्थसंकल्प सादर केला, म्हणजे काही देणार होते आणि दिले नसते तर तोंडाला पाने पुसली असे म्हणता आले असते,मुळात त्यांनी काही दिलेच नाही मग असे कसे म्हणणार?
एवढे नाही निदान 'अर्थसंकल्पात महाराष्ट्राला गाजर' अशी बातमी तरी पाहिजे होती. अर्थात 'तोंडाला पाने पुसली'ची सर त्याला नाही पण तेवढ्यावर चालवून घेतले असते.
असो. घोर अपेक्षाभंग झाला आहे. :-)
tags: Language, phrases, humour
-सौरभ.
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
wartamaan patre aata kaat takat aahet...........tyach kaay aahe na yuwa pidhi che patrakar tyat samil honar aahet.mahtalyawar tyana badalalya nako????
उत्तर द्याहटवाswapna
स्वप्ना, प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
उत्तर द्याहटवामी हे सहज विरंगुळा म्हणून लिहले आहे. त्यात गांभीर्य असे नाहीच. :-)