शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०
गुरुवार, २९ एप्रिल, २०१०
समज गैरसमज...
"आई, मला एक सांग, या विवाह नामक प्रकाराची लोकांना एवढी आवड का आहे बरे? जो तो उठतो तो आपला विवाह करायला बघत असतो. आणि म्हणे की लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास उडायला लागला आहे. लुच्चे, खोटारडे कुठले!"
"नाही तरी तुझी काही लग्नाची तयारी नाही. सांगून सांगून थकले मी. माझी अर्धी लाकडं आता स्मशानात गेली तरी सूनमुख पाहण्याचं काही माझ्या नशिबात दिसत नाही. ज्यांना करायचा आहे ते करतील. तुला त्याचा त्रास का बाबा?
"मला त्रास का म्हणजे? वा गं वा! पेपरात असलं काही छापून येतं ते आम्हालाच वाचावं लागतं ना? ऑं? तुम्हाला काय करायचं ते करा म्हणावं चार भिंतींच्या आत! पेपरात छापून आणून आमच्या आईवडिलांची आमच्या मागे भुणभुण कशाला सुरु करता?"
"अरे पण कधी ना कधी तर लग्न करायलाच लागणार ना बाबा? पुढे तुझं वय वाढल्यावर हातीपायी धड मुलगी मिळायची मारामार होऊन बसेल."
"अगं आई, असं नसतं आता आजकाल, एकाने पोट भरलं नाहीतर लोक तीनचार देखील करायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि वयाचा तरी कुठे प्रश्न उरला आहे? अगं जिथे ’बालिकावधू’चं लग्न लोक मिटक्या मारत बघत आहेत आणि कसल्या कसल्या वाह्यात लोकांचे ’स्वयंवर’ होऊन त्यांना बायका मिळत आहेत तिथे माझ्या लग्नाची काय काळजी करतेस?"
"अरे देवा! कालचं बालिकावधू बघायचं राहून गेलं की रे! अरे न्यूजचॅनलवर त्या दोघांची एकत्र अशी पहिलीच मुलाखत लागली होती ती बघता बघता राहूनच गेलं."
"असल्या मालिकांचं रोजचं दळण बघणारी, डोक्याने अधू असलेली माणसं आहेत; म्हणूनच या कुलवधूंचं फावलं आहे."
"काय म्हणालास?"
"कुठे काय? काही नाही. तूच कुणा दोघांबद्दल काहीतरी सांगत होतीस."
"काय छान दिसत होते दोघं अरे... मला तर फार आनंद झाला बघ. किती वाद, भानगडी झाल्या पण शेवटी सगळं काही सुरळीत झालं हे काय कमी आहे का?"
"एवढं सगळं काही बाहेर आल्यावर आता तसं सुरळीत चाललंय असंच म्हणावं लागेल. तू म्हणतेस ते बरोबर आहे. तसे वयाच्या मानानं चांगलेच आहेत म्हणायचे दोघेही दिसायला. तो तर काय परराष्ट्रातलाच ना? ती पण तशी ठीक आहे म्हणा."
"परराष्ट्र? अं हो हो, ते परराष्ट्रच आहे म्हणा! पण मी काय म्हणते की एवढे चांगले चांगले इतर पर्याय असताना आधीच एक लग्न झालेला मुलगा तिने का निवडला असावा?"
"मला काय माहित? नोकरीला जशी अनुभवाची गरज असते तसेच आता लग्नाचा जोडीदारही अनुभवीच हवा असा लोकांचा ग्रह होऊ लागलेला दिसतो."
"काय माहित बाबा? तसेही असेल. कशाचा कशाला धरबंद राहिलेला नाही. उद्या काय बघावे लागेल, वाचावे लागेल काही सांगता यायचे नाही."
"पण मी काय म्हणतो आई, ही बातमी बाहेर फुटलीच कशी? स्वत:च्या लग्नाची बातमी पेपरात छापून येते, रिकामटेकडे लोक ती चांगली चघळत बसतात, तिचं चर्वितचर्वण करतात, हे पाहून यांना काहीच कसं वाटत नाही?"
"अरे हे सगळं त्या नालायक मीडियाचं काम रे! ब्रेकिंग न्यूज मिळवता मिळवता स्वत:चं कंबरडं मोडायची वेळ आली तरी त्यांना काही व्हायचं नाही."
"हो ना तसे आहे खरे! पण मी काय म्हणतो, हा एवढा सगळा गदारोळ झाला, एवढी लफडी कुलंगडी बाहेर पडली, आता त्या संघांचे काय होणार काय माहित!"
"संघाचे काय होणार कप्पाळ! तो पुढेही त्याची खेळी खेळतच राहील बघ. उलट त्याच्या कामगिरीत सुधारणाच होईल बघ."
"सुधारणा कसली व्हायची आहे डोंबलाची. त्याला खूप पश्चाताप होऊन त्याच्या वागणुकीत सुधारणा होईल असे तुला वाटत असेल तर तो भ्रमच म्हटला पाहिजे."
"हो रे बाबा! पुरुषाचीच जात ती! कधी सुधरायची नाही. पण आता कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करणार वगैरे काही कळलं का रे?"
"प्रतिनिधित्व वगैरे काही नाही आता. भारतातून गच्छंती व्हायची वेळ आल्यावर कसलं आलं आहे प्रतिनिधित्व?"
"असं का बोलतोस रे? मी तर त्यांना आशीर्वाद दिलाय. ’सुखाने नांदा पुष्कळ’!"
"काय म्हणालीस? हे बरं आहे की! तुला बरं सगळं माहित असतं आजकाल आई! तुला अगदी नावसुद्धा माहित आहे सुनंदा पुष्कर?"
"काय? कोण ही सुनंदा पुष्कर? कशाबद्दल बोलतो आहेस? तू स्वत: कोणती मुलगी बघितली आहेस का? माझी काही हरकत नाही हं बाबा! उगीच डोक्यात राख घालून घेऊ नकोस."
"काय? माझं लग्न सुनंदा पुष्करशी? अगं आई काय बरळतेस तू?"
"अरे गाढवा तू काय बोलतो आहेस मग?
"अगं आई मी तर शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल बोलत होतो. तू कशाबद्दल बोलत होतीस?"
"अरे देवा, मी तर सानिया आणि शोएब मलिक बद्दल बोलत होते रे..."
"दुर्दैव आपलं, दुसरं काय? मी काय म्हणतो आई, आता आपण लोकांच्या दुसर्या तिसर्या लग्नाबद्दल, जी निश्चितच अभिनामाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, तिच्याबद्दल बोलत असतानाही; मी जे बोलत होतो त्याचसारख्या दुसर्या एका घटनेबद्दल तू बोलत होतीस याला काय म्हणावं? जगाची नीतिमत्ता एवढी खालावली गेल्या काही वर्षांत?"
"चिंता करण्यासारखीच परिस्थिती आहे बाबा! कलियुग कलियुग म्हणतात ते हेच."
"आई तुझी माफी मागितली पाहिजे."
"कसली माफी मागतोस बाबा? जिथं लोकांनाच काही लाज उरलेली नाही, तिथं तू आणि मी एकमेकांची माफी मागून काय होणार? जे जे होईल ते बघत राहणे हेच सामान्य माणसाच्या हातात राहिले आहे."

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०
चीन : एक अपूर्व अनुभव
मागच्या एका नोंदीत मी गाडगीळांच्या बर्याच प्रवासवर्णनपर पुस्तकांबद्दल लिहले होते. गोपुरांच्या प्रदेशात हे गंगाधर गाडगीळांचे पहिले प्रवासवर्णन. पुढे त्यांना रॉकफेलर फाऊंडेशनची अभ्यासवृत्ती मिळाली तेव्हा त्यांनी युरोप, इंग्लंड, अमेरिका, हवाई, जपान, बॅंकॉक, सिंगापूर असा भरभक्कम प्रवास केला. या प्रवासावरच त्यांनी बहुतेक प्रवासवर्णने लिहलेली आहेत. (अर्थात प्रत्येक प्रवासावर पुस्तक लिहलेले नाही. :-(
तर गंगाधर गाडगीळांनी लिहलेले लिहलेले ’चीन:एक अपूर्व अनुभव’ हे प्रवासवर्णन नुकतेच वाचले. लेखकांच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून त्यांना नोव्हेंबर १९९१ मध्ये चीनला जाण्याची संधी मिळाली. त्यातल्या अनुभवांवर हे पुस्तक बेतलेले आहे. तसे रुढार्थाने याला प्रवासवर्णन म्हणता येणार नाही. कारण प्रवासाची सुरुवात कशी झाली, कोणती ठिकाणे बघितली, त्यांचा इतिहास, त्या देशातल्या लोकांचे राहणीमान, आलेले अनुभव, घडलेले प्रसंग अशा वळणाने जाणारे हे पुस्तक नाही. गाडगीळांच्या आधीच्या प्रवासवर्णनपर पुस्तकांपेक्षा हे थोडे वेगळे आहे.
पण मग वेगळे म्हणजे कसे? गाडगीळ प्रस्तावनेत म्हणतात, "चीनचे प्रवासवर्णन हे अनुभवांचं प्रवासचित्रण असलं तरी प्राधान्यानं कलात्मक निर्मिती नव्हती. माहिती देणं, अनुभवांचा अन्वयार्थ लावणं हा या लेखनामागचा हेतू होता. त्यामुळे सातासमुद्रापलीकडे या पुस्तकातील लेख लिहताना जी पद्धती मी वापरली ती येथे वापरणं शक्य नव्हतं. चीनचं प्रवासवर्णन लिहताना काहीशी वेगळी पद्धती मी अनुसरली आहे. साहित्य, आर्थिक स्थिती, समाजजीवन इत्यादींबद्दलची प्रवासभर विखुरलेली निवेदनं मी एकत्र केली आहे. त्याचं विश्लेषण करुन अन्वयार्थ लावला आहे."
स्वत: गाडगीळ अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे साम्यवादाने वाटचाल करणार्या चीनचे त्यांनी बारीक निरीक्षण केले आहे. शहरांमधील मॉलमध्ये असणार्या गर्दीवरुन लोकांच्या क्रयशक्तीबद्दल, झोपडपट्ट्यांच्या प्रमाणावरुन साम्यवादाच्या उपयुक्ततेबद्दल अशा छोट्या छोट्या बाबींवरुन गाडगीळांनी या अजस्र ड्रॅगनचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.
एवढंच काय तर ते राहत असलेल्या हॉटेलातलं निरीक्षण नोंदवताना ते म्हणतात," चीनमध्ये आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो तेथे कधी कधी चार-पाच घड्याळे लावलेली असत. त्यात चीनमधील वेळेप्रमाणे अन्य महत्त्वाच्या शहरातील वेळही दाखवलेली असे. त्यामुळे चीनला कोणती शहरे महत्त्वाची वाटतात ते चटकन कळायचं. या घड्याळात टोकियो, न्यूयॉर्क, लॉस ऍंजेलिस, लंडन इत्यादी शहरांतल्या वेळा दाखवलेल्या असत. त्याबरोबरच कराचीतील वेळही दाखवलेली असे. पण दिल्ली अगर मुंबई येथील वेळ मात्र दाखवलेली नसे. म्हणजे चीनला पाकिस्तान जवळचा आणि महत्त्वाचा वाटतो, भारत नव्हे. आपण तिबेट चीनला आंदण दिल्यावर असं व्हावं हे अपेक्षितच होतं. भाईभाई असा उदघोष करणार्या आमच्या महान नेत्यांना मात्र ते कळलं नाही."
गाडगीळांची बारीक नजर पुस्तकात अशी सतत जाणवत राहते. एखाद्या लहान मुलाने प्रत्येक वस्तू कुतुहलाने न्याहाळावी तशी!
या प्रवासात त्यांनी चीनचा ग्रामीण भागही जवळून बघितला. चीनमधला ग्रामीण भाग आणि भारतातल्या गावाकडच्या चित्राची तुलना करताना त्यांनी लिहले आहे,"आपल्या ग्रामीण भागातून प्रवास करताना अनेक रिकामटेकडी माणसं रस्त्याच्या कडेला बसून गप्पा छाटताना आणि विड्या ओढताना दिसतात. अनेक परदेशी लोकांनी तुमच्या देशात माणसं अशी रिकामटेकडी कशी बसलेली असतात, असा प्रश्न मला विचारलेला आहे. चीनमध्ये मात्र रस्त्याच्या कडेला बसलेली अशी रिकामटेकडी माणसं मला आढळली नाहीत. सगळी माणसं कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली होती. नाही म्हणायला एक अगदी म्हातारी बाई आपल्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसलेली मला आढळली. पण तिच्या हातात सुद्धा काहीतरी विणकाम होतं." खूपच मार्मिक निरीक्षण आहे हे! डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हा वाक्प्रयोग वापरायचा मोह होतोय, तो आवरतो; मात्र काही तरी बोध देणारं नक्कीच म्हणता येईल. आणि गेल्याच काही वर्षात झपाट्याने आपल्या पुढे गेलेल्या चीनचं रहस्य उलगडणारंही!
चीनच्या प्रवासाला गेल्यावर तिथल्या अगम्य खाद्यसंस्कृतीबद्दलही काहीतरी उल्लेख येणे अपरिहार्यच आहे. तसा तो या पुस्तकातही आलेला आहे. गाडगीळ म्हणतात,"एका वाटोळ्या टेबलाभोवती आम्ही बसलो. त्या टेबलावर एक जराशी लहान वाटोळी तबकडी होती. तिच्यावर एकामागून एक पदार्थांच्या बश्या आणून ठेवल्या जाऊ लागल्या. चॉपस्टिकने खाता यावं इतकेच पदार्थाचे तुकडे केलेले असत, पण आमचे चिनी स्नेही आपल्या चॉपस्टीक्स इतक्या कौशल्यानं वापरत होते की आम्ही चकितच झालो. जेवणात किती पदार्थ असणार ते आम्हाला सांगितलेलं नसे. एकामागून एक असे ते सारखे येतच राहात. ते पंधरा तरी सहज असत. बॅंक्वेट असलं की त्यांची संख्या वीस किंवा अधिक असायची. त्यामुळे आपण काय खायचं, किती खायचं, कुठे थांबायचं हे ठरवणं फार अवघड व्हायचं."
अर्थात चीनला गेल्यावर गाडगीळांनी चंद्रावरुनही दिसण्याचा पोकळ दावा करणार्या जगप्रसिद्ध The Great Wall of China लाही भेट दिलीच.. त्याबद्दल ते म्हणतात,"...........
असो. पुस्तकाच्या ओळखीसाठी आणि मनुष्य प्राण्यांमध्ये उपजत असलेले कुतुहल जागे करण्यासाठी इतके लिखाण पुरे आहे. सगळेच सांगण्याचे काही कारण नाही, तेव्हा इथेच थांबतो.
पुस्तकाची पाने, प्रकाशक, मूल्य इ. बाबत माहिती देऊ शकत नसल्याबद्दल क्षमस्व! मी ते लायब्ररीतून आणून वाचले. बरीच जुनी प्रत होती.
-सौरभदा.

टॅग्ज
एकूण,
गंगाधर गाडगीळ,
प्रवास,
मराठी साहित्य
रविवार, ११ एप्रिल, २०१०
गावाकडे...
गेले काही दिवस ब्लॉग लिखाणातून विश्रांती घेतली होती. मामाकडे जाऊन गावाला चांगला आठवडाभर राहून आलो. दरवेळेस जाऊन एक दोन दिवसांसाठी तोंड दाखवून परत येत असल्यानं यावेळेस भरपूर राहण्याची तयारी करुनच गेलो होतो. मामाचा आग्रहही होताच. करमत नाही, कंटाळाच येतो वगैरे कारणं एकदम बाजूला सारून टाकली. शहरात रोज संगणकाची, इंटरनेटची सवय लागलेली होती. एक दिवस इंटरनेटवर भटकणे, विरोप तपासले नाहीत तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. अजूनही हे मान्य करायला कचरतो पण इंटरनेट, संगणकाचे मला व्यसन लागले आहे असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. त्यामुळे गावाला जाताना बरोबर लॅपटॉप घेतला नाही, मोबाईल तर माझ्याजवळ नाहीच त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नव्हता. यात कॅमेरा पण आणलेला नाही हे माझ्या तिथे गेल्यावर लक्षात आले. हळहळ वाटली पण झाले ते बरेच झाले असे मानून गप्प बसलो.
वेळ कसा काढायचा म्हणून अर्थातच पुस्तकं वाचायला घेतली होती. अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी डिक्शनरी घेतली. ग्रंथालयातून आणलेले वसंत बापटांचे देशांतरीच्या गोष्टी, खांडेकरांचा वनदेवता हा रुपक कथांचा संग्रह पिशवीत टाकला आणि निघालो. आईला आणि मला सोडून भाऊ परत निघून गेला.
पुण्यामुंबईत भारनियमन बंद झालेले असले तरी गावाकडे ते अजूनही चालूच आहे. इथल्या लोकांनी त्यांचे रोजचे जगणेही त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे आखून टाकले आहे. टीव्हीवरचे रोज बघितलेच पाहिजे असे काही नसल्याने (संगणक वापरातून वेळ मिळाला तर टीव्ही बघशील ना असे आईचे मत आहे ) वीज असली काय नसली काय काही फरक पडत नव्हता. इतर दुसरी वीज लागतील अशी उपकरणं पुण्यातच सोडून आलो त्यामुळे भारनियमनाचे वेळापत्रक लक्षात ठेवण्याचे काही कारण नव्हते. उन्हाळ्यात रात्री झोपताना अगदी गळ्याशी आले तरच पंखा लागतो आणि शिवाय पुण्यात सूर्य आता आग ओकायला लागला असला तरी गावाकडे त्याचे चटके बसत नव्हते. त्यामुळे पंख्याचाही प्रश्न निकालात निघाला.
पहिल्या दिवशी कोणाचे काय, कोणाचे काय वगैरे क्षेमकुशल विचारुन झाले. नाहीतरी पुण्यापासून तसे गाव जवळच आहे त्यामुळे अगदीच कित्येक वर्षांनी भेटतो आहे वगैरे प्रकार नव्हता. दुसर्या दिवशी काय करु हा प्रश्न छळायला लागला. पुस्तकं आणलेली असली तरी ती पिशवीतून काढून वाचायला हातात घ्यायची इच्छा होईना.
मामाने इकडे कोकाकोलाची एजन्सी घेतलेली आहे. त्याचा स्वतःचा टेंपो आहे. या भागातल्या विविध दुकाने, हॉटेलांमध्ये तो माल पुरवतो. शिवाय कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म आहेत. बर्यापैकी शेती आहे. त्यामुळे गावी गेल्यावर मळ्यात जाणे हा नेहमीचा परिपाठ आहे. कोकाकोलाची एजन्सी चालवणे हे कष्टाचे काम आहे. माल घेऊन गाडी आली तर तो उतरवून घेणे, आधीचे रिकाम्या बाटल्यांचे क्रेट त्यात भरुन देणे हे दरेक तीन चार दिवसाला करायचे काम असते. शिवाय आलेला माल टेंपोत भरून दुकानांमध्ये माल पुरवणे, त्यांच्याकडूनचे रिकामे क्रेट गोळा करणे, ते परत आणून उतरवणे असे भरगच्च काम असते. शिवाय दुकाना,हॉटेलांमधून गोळा केलेले क्रेट वर्गीकरण केलेले नसतात. हे एक वेगळेच म्हटले तर सोपे पण वेळखाऊ काम आहे. म्हणजे एखाद्याला जर समजा स्प्राईटचे दहा, कोकचे पाच, माझाचे सहा क्रेट दिलेले असतील तर परत घेताना मात्र रिकाम्या बाटल्या सगळ्या एकत्र येतात. म्हणजे कोक, स्प्राईट, माझा, फँटा सगळे एकत्रच येते. या मग रिकाम्या बाटल्या कंपनीला जसेच्या तशा पाठवता येत नाहीत. वर्गीकरण करुन पाठवावे लागते. अन्यथा परत ते वेगळे करायचे पैसेही कंपनी कापून घेते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची ही मनमानीच म्हणावी लागेल. गावाला गेल्यावर मग हे कामही करुन बघितले. मळ्यात फ्रीज नसल्याने काम करुन झाल्यावर मग त्यातलीच एक माझाची बाटली फोडून गरमगरम शीतपेयाची मजा घेतली.
झोपायला पण मग मळ्यातच. कोंबड्यांचे खाद्य, त्याचा विशिष्ट वास, इकडून तिकडून खुडबुड करत फिरणारे उंदीर, त्यामुळे सतत अंधारात आपल्याबरोबर अजूनही कोणी या खोलीत आहे असे होणारे भयकारी भास अशा वातावरणात जमिनीवर पथारी पसरुन गुडूप झोपून गेलो. एकदम नीरव म्हणतात त्या शांततेत!
-सौरभ.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)